वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात शनिवार दि. 29 रोजी 152 जणांना कोरोना बाधा झाली तर 138 रुग्ण बरे झाले व 1 बळी गेला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी दिली. जिल्हय़ात एकूण बाधित संख्या 5910 झाली असून यापैकी 4991 संसर्गमुक्त झाले तर बळींची संख्या 73 वर पोचली आहे. तर 746 रुग्णावर उपचार सुरू आहेत.
शनिवार दि. 29 रोजी बागलकोट तालुक्यात 54, जमखंडी 24, हुनगुंद 23, बदामी 20, मुधोळ 18, बिळगी 12 अन्य जिल्हय़ातील 1 असे एकूण 152 जण कोरोनाबाधित झाले. जिल्हय़ात आतापर्यंत 56,876 व्यक्तींचे नमुने तपासणीकरिता प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 50202 निगेटिव्ह, 5910 पॉझिटिव्ह आढळले तर 455 व्यक्तींचा अहवाल येणे शिल्लक आहे.









