प्रतिनिधी / कुडचडे
बाग, कुडचडे येथील जुवारी नदीच्या पात्रात मंगळवारी सकाळी अंदाजे 10.30 च्या सुमारास एका युवकाने आत्महत्या करण्याचा प्रकार घडला. संध्याकाळपर्यंत कुडचडे पोलीस व अग्निशामक दलाकडून त्याचा शोध चालू होता, अशी माहिती पोलीस स्थानकातून प्राप्त झाली.









