क्रीडाइची सर्वसाधारण सभा संपन्न
प्रतिनिधी / सांगली
कोरोनामुळे टप्प झालेला बांधकाम व्यवसाय आणि नवीन बांधकाम नियमावलीच्या अनुषंगाने आलेल्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी क्रीडाइच्या माध्यमातून प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष रवींद्र खिलारे यांनी केले. ते क्रीडाइ या संस्थेच्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.
सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेने सन 2019 20 मधील केलेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला. सांगली येथे मागील वर्षी आलेल्या महापुरामध्ये केलेले समाज उपयोगी कामे तसेच शाळेत केलेल्या कॉम्प्युटर, बेंच व कपाटे वाटप तसेच सांगली नगर वाचनालय येथील पुस्तकासाठी दिलेल्या रॅक तसेच कोविडमध्ये महापालिका प्रशासनाला तसेच साईटकामगारांना केलेली मदत यांचा यामध्ये समावेश आहे.
तसेच नवीन बांधकाम नियमावली चे व्यवसायवर होणारे परिणाम याबद्दल चर्चा झाली. तसेच सभासदांच्या मुलांनी व मुलींनी दहावी-बारावी व इतर विषयात मिळवलेले यश अशा यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सांगलीचे सभासद सहभागी झाले होते. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रवींद्र खिलारे पवार व सचिव दिलीप पाटील यांनी दिली. सभेस क्रेडाई महाराष्ट्राचे सहसचिव विकास लागू दीपक सूर्यवंशी, क्रेडाई सांगली संस्थेचे उपाध्यक्ष सुनील कोकितकर , बाळासाहेब भोसले खजिनदार जयराज सगरे, सह खजिनदार वरूण पटवर्धन कॉर्डिनेटर उत्तम आरगे व डी. बी. शिंदे उपस्थित होते . सभेचे नियोजन सहसचिव इम्रान मुल्ला यांनी केले होते.