प्रतिनिधी/ रत्नागिरी
जागा तसेच फ्लॅटचे आमिष दाखवून करोडो रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला बांधकाम व्यावसायिक महेश गाविंद नवाथे याला रत्नागिरी पोलिसांनी अटक केल़ी विविध गुह्यांमध्ये नवाथे याच्याविरूद्ध वॉरंट बजावण्यात आले होत़े पोलिसांच्या पथकाने त्याला शुक्रवारी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आल़े यापूर्वी 2016 मध्ये पोलिसांकडून नवाथे याला अटक करण्यात आली होत़ी
रत्नागिरी येथे 2015 मध्ये बांधकाम व्यवसाय करत असताना नवाथे याने जागा व फ्लॅटशी संबंधित 340 जणांची 14 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मुख्य आरोपी महेश गोविंद नवाथे याच्याविरूद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होत़ा त्यानंतर नवाथे फरार झाला होत़ा 2016 मध्ये शहर पोलिसांकडून नवाथे याला कल्याण-डोंबीवली येथून अटक केली होत़ी यानंतरही नवाथे फरार झाल़ा अखेर विविध वॉरंटमध्ये रत्नागिरी पोलिसांकडून नवाथे याचा शोध घेवून अटक करण्यात आली आह़े
महेश नवाथे याने रत्नागिरीत ‘युटोपिया आयडियल सीटी’ नावाच्या आंतरराष्ट्रीय स्मार्टसीटी प्रकल्पाच्या नावाखाली फसवूणक केल़ी रत्नागिरी तालुक्यातील धामणसे-निवेंडी येथे रत्नागिरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.चा संचालक महेश नवाथे याने युटोपिया आयडियल सीटी नावाचा एक अत्याधुनिक प्रकल्प करण्याचे नियोजन केले होते. या कंपनीने आधुनिक पद्धतीने जाहिरात करून ग्राहक मिळवले. प्रत्येक ग्राहकाकडून सुमारे 4 ते 5 लाख रुपये आगाऊ घेऊन त्याच्या पावत्या देण्यात आल्या. ग्राहकांना दिलेल्या मुदतीत फ्लॅटचा ताबा देता न मिळाल्यास गुंतवलेली रक्कम 15 टक्के व्याजदराने परत करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. या प्रकरणात 340 ग्राहकांकडून सुमारे 14 कोटी 28 लाख 23 हजार 820 रुपये महेश नवाथे याने घेतले होत़े ग्राहकांना मुदतीत फ्लॅट न मिळाल्यामुळे यापैकी 57 ग्राहकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होत़ी
…









