प्रतिनिधी/ बांदा
बांदा येथिल श्री विठ्ठल रखुमाई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार दि.15 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. कार्तिकी भागवत एकादशीला दरवर्षी हा जत्रोत्सव साजरा केला जातो. या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल मंदिरात संपुर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे 5 ते 7.30 काकडआरती होईल.त्यानंतर दर्शन व तीर्थप्रसादास आरंभ होईल. सायंकाळी उत्सवमुर्तीचे मंदिरात आगमन होईल. सायं 5 ते 7 स्थानिक महिला भजनकर्मींची भजनसेवा होईल. 7 वाजता नित्य सायंआरती तर 9 वाजता श्रींचा पालखी सोहळा आरंभ होईल. जत्रोत्सवानिमित्त आजगांवकर दशावतार नाट्यमंडळाच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्री विठ्ठल मंदिर बांदा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच मंदिरात पाडव्यापासुन दररोज पहाटे काकडआरती सोहऴा सुरु असून हा कार्यक्रम शुक्रवार दि.19 पर्यंत सुरु राहणार आहे.









