प्रतिनिधी/बांदा-
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बांदा गडगेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील जमीन मालक सुभाष तोरसकर व विजय तोरसकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अनावरण सोहळा ह्याची देही हाची डोळा पाहण्यासाठी बांदा दशक्रोशीसह, सिंधुदुर्ग व गोवा परिसरातील शिवप्रेमी दाखल झाले होते.सुरुवातीला फुकेरी हनुमंतगड येथून आलेल्या ज्योतीचे स्वागत बांदा कट्टा कॉर्नर येथे करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा करून हजारो शिवप्रेमींनी रॅलीत सहभाग घेतला. यावेळी कट्टा कॉर्नर ते गडगेवाडी येथील शिवस्मारक पर्यंत रॅली काढण्यात आली यात सिंधुरत्न ढोल पथक पाचारण करण्यात आले होते. सर्व वातावरण शिवमय झाले होते.स्मारक ठिकाणी आल्यानंतर शिवजन्म सोहळा संपन्न झाला.यावेळी डेंगवे ग्रामस्थांनी सुद्धा रॅली आणली होती. तद्नंतर अनावरण सोहळा सम्पन्न झाला त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते









