प्रतिनिधी/ बेळगाव
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही कर्नाटक हिंदी प्रचार समिती आणि बहुभाषा संगम संस्था बेंगळूर यांच्यावतीने आयोजित बहुभाषिक काव्यसंमेलनात बेळगावच्या तीन कवयित्रींची निवड करण्यात आली आहे.
सदर काव्यसंमेलन रविवार दि. 12 रोजी सकाळी 10 वाजता बेंगळूर या ठिकाणी होणार आहे. कविसंमेलनासाठी बेळगाव येथील अस्मिता आळतेकर, रोशनी हुंद्रे व मनिषा नाडगौडा यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या कवयित्रींनी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आदींसहित बेळगाव ग्रामीण भागात होणाऱया साहित्य संमेलनात भाग घेऊन आपल्या उत्कृष्ट अशा रचना सादर केल्या आहेत. यामध्ये अस्मिता आळतेकर यांचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तर बाकी दोन कवयित्रींचे प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.









