बीबी क्रीम हे नाव गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत आहे. झटपट तयार व्हायचं असेल तर बीबी क्रीमला पर्याय नाही. तुमच्याकडे बीबी क्रीम असेल तर इतर मेक अप उत्पादनांची गरज पडत नाही. बीबी क्रीमची सुरूवात जर्मनीमध्ये झाली असली तरी आता आशियायी आणि कोरियन महिला हे क्रीम मोठय़ा प्रमाणावर वापरतात. या क्रीमच्या गुणवैशिष्ट्यांविषयी…
* वजनाला हलकं- बीबी क्रीम वजनाला हलकं असल्याने चेहर्यावर सफाईदारपणे पसरतं. त्यामुळे वापरानंतर चेहर्यावर मेक अपचे थर दिसत नाहीत.
* रोजच्या वापरासाठी योग्य- बीबी क्रीममध्ये कोणतेही अपायकारक घटक नसल्याने दैनंदिन जीवनात हे क्रीम सहज वापरता येतं.
* मॉईश्चरायझर लावण्याची गरज नाही- बीबी क्रीम चेहर्यावरील मॉईश्चरचं प्रमाण संतुलित ठेवत असल्याने मॉईश्चरायझर लावण्याची गरज नाही.
* फाउंडेशनची गरज नाही-त्वचेच्या टोनशी जुळणार्या घटकांमुळे बीबी क्रीम लावल्यानंतर फाउंडेशन लावावं लागत नाही.
* स्किन टोनशी मिळतेजुळते रंग- बाजारात बीबी क्रीमचे स्किन टोनशी मिळतेजुळते रंग उपलब्ध असल्याने तुमच्या त्वचेसाठी योग्य रंग निवडणं सोपं जातं.
* प्रत्येक स्किन टाईपसाठी उपयुक्त- बीबी क्रीम प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असल्याने संवेदनशील त्वचा असणारेही याचा वापर करू शकतात.
* नैसर्गिक लूक- बीबी क्रीममुळे त्वचा तेलकट दिसत नाही. तुम्हाला नैसर्गिक लूक मिळण्यास मदत होते.
* डाग लपवते- बीबी क्रीम कन्सीलरप्रमाणे चेहर्यावरील डाग आणि खड्डे लपवण्यास मदत करते. * कांती उजळवण्यास मदत- बीबी क्रीम त्वचेच्या अंतर्भागात जाऊन काम करत असल्याने कांती उजळवण्यास मदत होते.









