वार्ताहर / उत्तूर
बहिरेवाडी नजीक शनिवार दि. 18 रोजी दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास एस. टी. व ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बस चालक संभाजी कांबळे (वय 58) यांच्यासह सहा प्रवाशी जखमी झाले. याबाबतची फिर्याद चालक कांबळे यांनी पोलीसात दिली असून ट्रक चालक सर्जेराव पाटील (रा. हळदी, ता. करवीर) यांच्या विरोधाता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी, आजरा आगाराची जोतीबा-आजरा आजऱयाकडे येत होती. यावेळी आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन सर्जेराव पाटील कोल्हापूरच्या दिशेने जात होते. दुपारी 2.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये एस. टी. चालक कांबळे यांच्यासह प्रवाशी युवराज आयवाळे, अब्दुलरशिद इंचनाळकर (65), सुषमा उंटावळे (26), महादेव मिसाळ (63), संभाजी सावंत (53), मालूबाई पाटील (55) हे जखमी झाले असून त्यांच्यावर गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पोलीसात झाली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार बी. एस. कोचरगी करीत आहेत.
मंत्री मुश्रीफ यांनी जखमींना पाठविले रूग्णालयात
बहिरेवाडीनजीक दुपारी हा अपघात झाला त्यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ उत्तूर येथील कार्यक्रम आटोपून कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. अपघातस्थळी मंत्री मुश्रीफ यांनी थांबून अपघाताची माहिती घेतली. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस उपनिरिक्षक विवेकानंद राळभाते यांना जखमींना तातडीने गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्याच्या सूचना दिल्या. आपल्या ताफ्यातील एक गाडी देऊन या गाडीतून जखमींना रूग्णालयात दाखल केले









