वार्ताहर/ सांबरा
शिवाजी गल्ली, बसवण कुडची येथील बसवंत मल्लाप्पा बेडका यांच्या गवत गंजीला अज्ञातांनी आग लावल्याने सुमारे अडीच ट्रक्टर गवत जळून खाक झाले आहे. ही घटना रविवारी दुपारी घडली.
भरदुपारी आग लावल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. परिसरात जुगार खेळण्यासाठी बेळगाव आणि परिसरातील लोक येत असल्याने त्यांनीच आग लावली असावी, असा संशय शेतकऱयांतून व्यक्त होत आहे. बसवंत बेडका हे गेल्या सात वर्षांपासून लुमण्णा धामणेकर यांची खंडाने शेती करतात. शेती बळ्ळारी नाल्याला लागून असल्याने पावसाने पूर येऊन भात खराब झाले होते. त्यांनी दुबार पेरणी करून हे पीक घेतले होते. त्यामुळे त्यांचे 18 हजारांचे नुकसान झाले आहे..









