वृत्तसंस्था/ रोहतक
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर पडला आहे. गुरमीत राम रहिमला शनिवारी पॅरोल मिळाला आहे. राम रहिमला तीन महिन्यांमध्ये दुसऱयांदा पॅरोल मंजूर झाला आहे. पॅरोल मिळाल्यारव राम रहीम हा बरनावा डेऱयात पोहोचला आहे. राम रहीमने शाह सतनाम सिंहांच्या जन्मदिनात सामील होण्यासाठी 25 जानेवारी रोजी पॅरोल अर्ज केला होता. यावेळी राम रहीमला 40 दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. डेरा प्रमुखाच्या परिवाराने राम रहिमसाठी पॅरोलची मागणी करत तुरुंग अधिकाऱयांकडे अर्ज केला होता अशी माहिती हरियाणाचे तुरुंगमंत्री रणजीत सिंह चौटाला यांनी दिली आहे. राम रहीमला दोन युवतींवर बलात्कार केल्याप्रकरणी 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. राम रहीम हा हरियाणाच्या सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत होता.









