भक्तांची जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
बडेकोळमठाला जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. श्री नागेंदस्वामी बडेकोळमठ हे जागृत देवस्थान आहे. त्यामुळे बेळगाव जिह्यासह परराज्यातूनही या मठाला भक्त येतात. मात्र जवळपास 3 कि.मी. चा रस्ता हा अत्यंत खराब झाला असून त्या रस्त्याची तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी भक्तांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांनी लवकरात लवकर हा रस्ता करू, असे ठोस आश्वासन या भक्तांना दिले.
जिह्यातील एक अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्रीनागेंद्र स्वामी बडेकोळमठकडे पाहिले जाते. बागेवाडी घाटापासून 3 कि.मी. आत हा मठ आहे. त्यामुळे भक्तांना या रस्त्यावरुनच मठाकडे जावे लागते. दररोज मोठय़ा संख्येने भक्त येत असतात. मात्र हा रस्ता खराब झाल्यामुळे भक्तांना त्रास होत आहे. या रस्त्यावरुन या परिसरात असलेल्या क्वॉरीमधून मोठय़ा ट्रक खडी नेत आहेत. त्यामुळे हा रस्ता वारंवार खराब होत आहे. तेंव्हा हा रस्ता काँक्रिटचाच करावा, अशी मागणी देखील करण्यात आली.
यावेळी ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. वाय. के. दिवटे, ऍड. मोहन नंदी, ऍड. बी. पी. जेवणी, ऍड. सुभाष मोदगेकर, ऍड. व्ही. आय. महांतशेट्टर, एम. के. कांबळे, एस. व्ही. पाटील, भरमा घोरपडे, बसू हुल्ल, बाबुराव जाधव, बसवराज हगेरी, राजू धुडूम, संतोष जेडी, विलास कामकर, श्रीकांत कामकर, तम्मन्ना दुलगोजी, शंकर हजेरी, शंकर कामकर, विजय कामकर यांच्यासह भक्त उपस्थित होते.









