ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बडगाममधील चरार-ए-शरीफ भागात आज सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले.
बडगाममधील चरार-ए-शरीफ भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. अंधारामुळे रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. अद्याप या भागात शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत एक जवान जखमी झाला आहे. त्याला लष्कराच्या 92 बेस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.









