नवी दिल्ली
मोटारसायकलची मोठय़ा प्रमाणात निर्यात करणाऱया बजाज ऑटोला कोरोनातून देशाची लवकरात लवकर सुटका होण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे परदेशात परिस्थिती लवकरात लवकर सामान्य होणे हे कंपनीसाठी अधिक फायद्याचे असणार आहे. कारण सध्या भारतात ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मिळत नसल्याचे दिसून आले आहे. कोरोनामुळे वाहनांच्या खरेदीवरही मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला आहे. रिक्षा आणि व्यावसायिक छोटय़ा वाहनांची निर्यात करण्यात बजाज कंपनी आघाडीवर आहे. अलीकडे हळुहळू निर्यातीत सुधारणा होत असल्याचे कंपनीने म्हटले असून येणाऱया काळात निर्यातीवर अधिकाधिक लक्ष केंद्रीत करणार आहे.









