नवी दिल्ली
इ-कॉमर्स क्षेत्रातील कंपनी फ्लिपकार्टने आपली नवी ‘फ्लिपकार्ट क्वीक’ ही सेवा नुकतीच सुरू केली असून ग्राहकांना ऑर्डरची डिलीव्हरी 90 मिनीटात पोहचती केली जाणार आहे. या अंतर्गत कंपनी ग्रोसरी (किराणा सामान) व घरगुती साहित्याचा पुरवठा जलदरितीने करणार आहे. बेंगळूरच्या काही भागात ही सेवा सध्या राबवली जाणार आहे नंतर तिचा विस्तार इतर शहरात केला जाणार असल्याचे सांगण्यात येते. सकाळी 6 वाजल्यापासून ग्राहकांना त्यांनी ऑर्डर केलेल्या साहित्याची पोहच केली जाणार आहे. मात्र यासाठी ग्राहकांना नाममात्र 29 रुपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर आवश्यक साहित्य 90 मिनीटात मिळण्याची व्यवस्था फ्लिपकार्टने केली आहे. या व्यवसायासाठी कंपनी स्थानिक किराणा दुकानांची मदत घेणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.









