नवी दिल्ली
फ्रान्सच्या प्रतिस्पर्धा प्राधिकरणाकडून अमेरिकेतील दिग्गज टेक कंपनी ऍपल कंपनीवर 1.2 अब्ज डॉलर (9,100) कोटी रुपयाचा दंड आकारला आहे. प्रतिस्पर्धी प्राधिकरणाने ऍपलने आमचा आर्थिक दुरुपयोग करुन स्वतंत्र्य रिटेल वितरकाच्यासोबतही गैर व्यवहार करण्यात आल्याचेही म्हटले आहे.
फ्रान्समध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड
फ्रान्समध्ये आतापर्यंत एखाद्या कंपनीवर इतक्या मोठय़ा प्रमाणात दंड आकारला नसून हा प्रथमच इतकय़ा मोठय़ा रक्कमेचा असल्याचे प्रतिस्पर्धी प्राधिकरणाचे मुख्य इसाबेल डि सिल्वा यांनी सांगितले आहे. यासोबतच ऍपलच्या होलसेल वितरकांचा टेक डाटा आणि इंग्राम मायक्रोवर 140 दशलक्ष युरोचा दंड लावला होता. या दोन वितरकांवर ऍपलसोबत मिळून लहान वितरकांची चेष्टा केल्याचाही आरोप केला आहे. 2012 मध्ये ऍपलची एक स्वतंत्र प्रीमियम रिसेलर यांनी विना प्रतिस्पर्धी पॅक्टिसचा आरोप केला आहे.
मागील महिन्यातही झाला दंड
ऍपलवर फ्रान्सने मागील महिन्यात 25 दशलक्ष युरो म्हणजे जवळपास 200 कोटी रुपयाचा दंड केला होता. हा दंड जुन्या आयफोनवरील अपडेट करण्याचा खोटा प्रयत्न करुन माहिती असतानाही तो स्लो करण्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळं एचओपी असोसिएशनकडून तक्रार दाखल करण्यात आली होती.
अमेरिकेतही आयफोन स्लो?
ऍपल जुने आयफोन मुद्यामहून स्लो करण्याचा प्रयत्न झाला होता, या संदर्भातील तडजोड करण्यासाठी ग्राहकांना 50 कोटी डॉलर (3,600 कोटी रुपये) ऍपल जमा करण्याच्या तयारीत आहे. सॅन जोसमधील जिल्हा न्यायालयातील कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. यानंतर अमेरिका सर्व प्रभावित ग्राहकांना 25-25 डॉलर देणार असल्याची माहिती आहे.