दोडामार्ग – प्रतिनिधी-
फूटवेअर डिझाईन अँड डेव्हलोपमेंट इन्स्टिटयूट च्या देशातील तेराव्या शाखेसाठी आडाळी औद्योगिक क्षेत्रात पाहणी झाली होती. मात्र गेल्या तीन वर्षात त्याबाबत कुठलीही हालचाल झाली नाही. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयच्या थेट नियंत्रणाखाली असलेल्या या प्रकल्पला चालना द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य पराग गावकर यांनी केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले.
हा राष्ट्रीय स्तरावरचा प्रकल्प असून सुरेश प्रभू केंद्रीय वाणिज्य मंत्री असताना 2018 मध्ये संस्थेच्या संचालकांनी आडाळीत येऊन 40 एकर जागा निश्चित केली होती. एफडीडीआय म्हणजेच फूटवेअर डिझाईन अँड डेव्हलोपमेंट इन्स्टिटयूटची स्थापना 1986 साली झाली आहे. उद्योगांसाठी उच्च तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ देणे, विविध डिझाईनचे संशोधन करणे, बिझनेस आणि मार्केटिंग मॅनेजमेंट, रिटेल मार्केटिंग, लेदर वस्तूच्या डिझाईन, फॅशन डिझाईन असे अनेकविध उद्योगपूरक उच्च दर्जाचे शिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिले जाते. राष्ट्रीय महत्वाची असा दर्जा या संस्थेला आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली संस्थेचे कामकाज चालते. देशात आतापर्यंत केवळ 12 संस्था आहेत. त्यातही दक्षिण भारतात चेन्नई वगळता अन्यत्र या संस्थेची शाखा नाही.
सुरेश प्रभू केंद्रीय वाणिज्य मंत्री असताना संस्थेचे संचालक अरुणकुमार सिन्हा हे २०१८ मध्ये सहकार्यनसह आडाळीत येऊन गेले होते . भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी सिन्हा यांनी येथील औद्योगिक क्षेत्रातील चाळीस एकर जागा संस्थेसाठी निश्चित केली होती . आजही श्री. सिन्हाच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. फूटवेअर क्षेत्रातील उद्योगांना दर्जेदार व जागतिकस्तराचे उच्च शिक्षित मनुष्यबळ पुरवणाऱ्या या संस्थेची शाखा आडाळीत झाल्यास येथील उद्योगाना त्याचा फायदा होईल. एमआयडीसी तील 40 एकर जागा संचालक पण हा प्रकल्प बारगळला. आता नारायण राणे केंद्रात मंत्री असल्याने त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावल्यास आयुष प्रकल्पासोबतच जागतिक दर्जाचे एक केंद्र आडाळीत उभे राहील . येथून मोप आंतराष्ट्रीय विमानतळ अवघ्या १५ किमीवर असल्याने त्याचाही फायदा मिळू शकतो . केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय वनौषधी संशोधन प्रकल्पला आडाळी औद्योगिक क्षेत्रातील 50 एकर जागा देण्यात आली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या संयुक्त सहभागातून हा प्रकल्प होतं आहे. भाजपचे प्रमोद जठार यांनी या प्रकल्पसाठी प्रयत्न केले. मात्र त्याचवेळी खासदार विनायक राऊत आमदार दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रयत्न केले. आता एफडीडीआय प्रकल्प येथे झाल्यास आडाळीला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळू शकते. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी संयुक्त प्रयत्न व्हावेत, असे निवेदन गावकर यांनी राणेना दिले. सुरेश प्रभू यांनाही यापूर्वी निवेदन दिले होते.









