सांगरुळ /प्रतिनिधी
फुलेवाडी ता. करवीर येथील माने सांस्कृतिक सभागृहात कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. आज पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले. नगरसेवक राहुल माने यांच्या पुढाकारातून आणि रोटरी फॉउंडेशन तसेच कोल्हापूर महापालिकेच्या सहकार्यातून हे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटर मध्ये एकूण ४० बेड असून यामध्ये २५ऑक्सिजन बेड आणि १५ इतर बेड अशी सुविधा करण्यात आली आहे.
या कोविड सेंटरला रोटरी क्लबकडून बेड पुरवण्यात आले आहेत तर महापालिका प्रशासन आणि माने कुटुंबियांकडून आरोग्य सुविधा तसेच रुग्णांच्या भोजनाची आणि इतर व्यवस्था करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी आजवर माने कुटुंबियांचे सामाजिक उपक्रमांमधील योगदान मोठे आहे. कोरोनाच्या या संकटकालामध्ये सुद्धा माने कुटुंबियांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या कोरोना सेंटरमुळे परिसरातील कोरोना बाधित रुग्णांवर तात्काळ उपचार करण्यास मदत होणार आहेअसे सांगितले.
यावेळी महापौर निलोफर आजरेकर, महापालिका आयुक्त मलीनाथ कलशेट्टी, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेवक राहुल माने, शोभा कावळे, रोटरीचे संग्राम पाटील, ऋषिकेश केसरकर,गिरीश जोशी, डॉ. मालू यांच्यासह रोटरीचे सदस्य आणि महापालिका पदाधिकारी उपस्थित होते.
Previous Articleनिवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचा राजीनामा
Next Article सोलापूर ग्रामीण भागात 244 कोरोना पॉझिटिव्ह, 9 मृत्यू









