जम्मू-काश्मीर/प्रतिनिधी)
जम्मू-काश्मीर (jammu-kashmir) प्रशासनाने फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी (syed ali shah gilani) यांचे नातू अनीस-उल-इस्लामa (anis ul islam) याला शनिवारी सरकारी सेवेतून काढून टाकले. दहशतवादी कारवायांना (terorist attack) मदत केल्याच्या आरोपावरून त्याच्यावर ही कारवाई केली आहे. प्रशासनाने राज्यघटनेच्या अनुच्छेद ३११ अंतर्गत विशेष तरतुदींचा वापर करून अनीसला सरकारी सेवेतून काढून टाकले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) मध्ये संशोधन अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. हे सेंटर जम्मू-काश्मीर सरकारच्या सर्वात प्रतिष्ठित अधिवेशन आणि परिषद सुविधांपैकी एक असून ते उच्चस्तरीय बैठका आणि व्हीव्हीआयपी परिषदांसाठी वापरले जाते.
दहशतवादी कारवायांना मदत केल्याच्या आरोपावरून जम्मू-काश्मीर प्रशासनाने फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे नातू अनीस-उल-इस्लाम यांना शनिवारी सरकारी सेवेतून काढून टाकले आहे. काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांनी त्यांच्या नातवाच्या सरकारी नोकरीसाठी हिंसाचार केला होता, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिलीय. २०१६ मध्ये काश्मीरमध्ये काही काळ अशांतता होती. मात्र, त्यांच्या नातवाच्या नियुक्तीनंतर लगेच परिस्थिती शांत झाली होती. गिलानी यांचं १ सप्टेंबर रोजी निधन झालं. अनीस हा सय्यद गिलानी यांच्या मुलीला मुलगा असून फुटीरतावादी नेते अल्ताफ अहमद शाह हे अनीसचे वडील आहेत. २०१६ मध्ये मेहबूबा मुफ्ती जम्मू -काश्मीरच्या मुख्यमंत्री असताना एसकेआयसीसी पर्यटन खात्याच्या अखत्यारीत होते.









