ऑनलाईन टीम / मनीला :
फिलिपिन्स हवाई दलाचे सी-130 विमान आज सकाळी दुर्घटनाग्रस्त झाले. या विमानात 85 लोक प्रवास करत होते. त्यामधील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 40 लोकांना वाचविण्यात यश आले असून, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. फिलिपिन्सच्या सशस्त्र दलाचे प्रमुख सिरिलेटो सोबेजाना यांनी यासंदर्भात माहिती दिली.
फिलिपिन्स हवाई दलाचे हे विमान पाटिकुलच्या सुलू प्रांतातील जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर या विमानाने पेट घेतला. विमानात 85 लोक होते. त्यामधील 40 जणांना आगीतून बाहेर काढण्यात यश आले असून, 17 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे.









