मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी नेहमीच स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशन करताना दिसतो. आपल्या अभिनयासह स्टाईलमुळे कायम चर्चेत असणारा अभिनेता प्रचंड फिटनेस फ्रिक देखील आहे. नुकतचं स्वप्नीलने त्याच्या इंस्टाग्राम अकांऊटवर ऍनिमल फ्लो वर्कआऊट करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. प्रीति झिंटा, करिश्मा तन्ना, कतरिना कैफ सारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी हे ऍनिमल फ्लो वर्कआऊट ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. आता स्वप्नील जोशीला या व्यायाम प्रकाराने भुरळ पाडली आहे.
स्वप्नीलने वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर करत त्याला ऍनिमल फ्लो लर्निंग फ्रॉम माय गुरु असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड हीट झाला. ऍनिमल फ्लो वर्कआऊट म्हणजे हा एक नवा प्रकारचा व्यायाम आहे . कोणत्याही ट्रेडिशनल वर्कआऊटपेक्षा हा अधिक प्रभावी ठरतो आणि तितकाच आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. हा व्यायाम जमिनीवरच करायचा असतो. यातील महत्वपूर्ण बाब म्हणजे यासाठी कोणत्याही साधनांची गरज भासत नाही. लॉकडाऊन दरम्यान जीम बंद असल्याने अनेक सेलिब्रिटींना याचा फायदा झाला. या व्यायामातून फिटनेस आणि स्टॅमिना भरपूर प्रमाणात प्राप्त होत असतो.









