नवी दिल्ली
15 हजार कोटी रुपयांच्या फार्मा उद्योगाला पीएलआय स्कीमकरीता मंजुरी मिळाली असून यासंबंधीची मार्गसूची जारी करण्यात आली आहे. दरम्यान इच्छुकांना 31 जुलैपर्यंत स्कीमचा लाभ उठवण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
सरकारने फार्मा उद्योगाकरीता प्रोडक्शन लिंकड् इन्सेंटीव्ह (पीएलआय) स्कीमसंदर्भातील मार्गसूची जारी केली आहे. फार्मा क्षेत्रात उत्पादन आणि गुंतवणूक वाढण्यासाठी या स्कीमचा फायदा होणार आहे. याअंतर्गत 15 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.









