ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणि विषाणूचे बदलते स्वरूप लक्षात घेता अमेरिकेची लस उत्पादक कंपनी ‘फायझर-बायोएनटेक’ नागरिकांना तिसरा डोस देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून मान्यता मिळवण्यासाठी या कंपनीचा प्रयत्न सुरू आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या डोसमुळे कोरोनाच्या बीटा व्हेरिएंटविरोधात चांगले संरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे. प्रथम दक्षिण आफ्रिकेत सापडलेला बीटा व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक प्रभावी आहे.
‘जनरल नेचर’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, डेल्टा व्हेरिएंटवर फायझर लसीचा परिणाम फारसा दिसून आला नाही. डेल्टा व्हेरिएंटचा प्रभाव रोखण्यासाठी फायझर 64 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. यापूर्वी ही लस इतर कोरोना प्रकारांमध्ये 94 टक्क्यांपर्यंत प्रभावी होती. अशा परिस्थितीत फायझर तिसरा डोस देण्याची परवानगी मागत आहे.









