प्रतिनिधी/ मडगाव
फातोर्डातील सुमारे 2500 गरजू कुटुंबियांना मोफत जीवनाश्यक वस्तू पुरविण्याचे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी ठरविले आहे. आपल्या पक्षाचे नगरसेवक, कार्यकर्ते यांच्यामार्फत इस्टरपर्यंत या वस्तू पोहोचतील यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे श्री. सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.
4 किलो तांदूळ, 1 किलो आटा, 1 किलो साखर, पाऊण किलो तूरडाळ, 100 ग्रॅमचे चहापावडर पाकीट, 1 लिटर तेल, प्रत्येकी एक पाकीट बिस्कीट व नूडल्स आणि नारळ अशा वस्तू त्याअंतर्गत पुरविण्यात येणार आहेत. या अडचणीच्या काळात आपल्या वुई फॉर फातोर्डा या सेवाभावी संस्थेमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे श्री. सरदेसाई यांनी म्हटले आहे.









