आंबा बागायतदारांना मिळणार लाभ : जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मोठे यश मिळाले आहे. हवामान आधरित फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वषी विमा कंपनी कडून तब्बल 22 कोटी 94 लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त जिल्हा बँकेला झाली आहे. सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 4 हजार 306 आंबा पीक विमा उतरलेल्या सभासद शेतकऱयांना लाभ मिळाला आहे अशी माहीती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजना 2019 अंतर्गत जिल्हय़ातील आंबा व काजू बागायतर 5334 शेतकऱयांनी जिल्हा बॅंकमार्फत 2 कोटी 72 लाखांचा विमा उतरविला होता. भारतीय कृषि विमा कंपनी मुंबई (AIC) मार्फत हा विमा ऊतरविण्यात आला होता. पैकी आंबा शेतकऱयांसाठी 22 कोटी 94 लाख इतकी विमा रक्कम जिल्हा बँकेकडे जमा झाल्याने कोरोना आपत्तीत आंबा बागायतदार शेतवऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा बँकने अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने संबधित विमा कंपनी व शासन स्तरावर केलेल्या पाठपुरव्याला मोठे यश मिळाले आहे. यावषी सुद्धा आंबा व काजू बागायतदार यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱयांनी आपली विमा रक्कम भरून विमा कवच घेण्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आवाहन केले आहे.









