कोरोनामुळे ग्राहकांचीही पाठ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनामुळे यंदाची दिवाळी फटाक्यांविना साजरी होणार का, असा सवाल शहरवासीयांना पडला आह़े दिवाळीला अवघे 11 दिवस बाकी असताना शहर पझ्रसरामध्ये कोठेही फटाक्यांचे स्टॉल अथवा किरकोळ विक्री होताना दिसून येत नाह़ी गतवर्षी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने आठवडा बाजार येथे फटाके विक्रीसाठी जागा दिली होत़ी यंदा मात्र कोरोनाच्Rप् पार्श्वभूमीवर फटाके खरेदी कमी होण्याची शक्यता फटाके विक्रेते युवराज पाथरे यांनी व्यक्त केल़ी
जिह्यातील कोरोना रुग्णाचीं संख्या घटली असून मृत्यूवरही नियंत्रण आले आह़े मात्र कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आह़े यासाठी फटाक्यांशिवाय †िदवाळी साजरी करण्याचे आवाहन समाजमाध्यमांमध्ये जोर धरत आह़े या आवाहनाचा परिणाम शहरी भागात विशेषत्वाने जाणवत आह़े
गणेशोत्सवापासून किरकोळ व घाऊक व्यापाऱयांकडे फटाक्यांची मागणी सुरु होत़े दसऱयानंतर ही लगबग वाढून दिवाळीच्या 2-3 आठवडे आधीपासून हा व्यापार शिगेला असत़ो यंदा कोरोनामुळे ग्राहकवर्ग दिवाळीत फटाक्यांवर खर्च करण्याच्या मनस्थितीत असेल का, हा प्रश्न उत्पादकांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत साऱयांनाच पडला आह़े गणेशोत्सवातही फटाके बाजारामध्ये मरगळ होत़ी नवरात्रोत्सवात कोरोनाचा फैलाव कमी होत असला तरीही फटाका बाजारात मरगळच होती, असे व्यापाऱयांनी सांगितल़े दिवाळीत फटाका बाजारावरील ग्रहण दूर होण्याची अपेक्षा विक्रेत्यांना होती. मात्र बदललेल्या आर्थिक परिस्थितीत यंदा दिवाळीत फटाक्यांची 20 ते 30 टक्केच राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
एका बाजूला कोरोना, दुसरीकडे दरवाढ
फटाका बाजारावर एका बाजूला कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे सावट असतानाच फटाक्यांच्या दरामध्यहे काही प्रमाणात वाढ झाली आह़े यंदा फुलबाजा पाकिट 40 ते 130, फटाक्यांची माळ 100 ते 2 हजार रुपयांपर्यंत, बॉम्ब 35 ते 500 रुपयांपर्यंत, भुईचक्र 250 ते 900 रुपये पाकिट अशा दरांमध्ये खरेदी करावे लागणार आहे.









