बेंगळूर
आर्थिक वर्ष 2021 मध्ये बांधकाम क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी प्रेस्टीज इस्टेटस्ला 1 हजार 456.2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. याआधीच्या वर्षात हाच नफा निव्वळ 403 कोटी रुपये इतका नोंदला गेला होता. दरम्यान शेअरबाजारात कंपनीचे समभाग 9 टक्क्यांनी उसळी घेताना दिसले. कंपनीच्या समभागाचा भाव बुधवारी 317 वर पोहचला होता. सदरच्या समभागाने गेल्या 12 महिन्याच्या कालावधीत 66 टक्क्यापर्यंत परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. मार्चला संपलेल्या तिमाहीअखेर कंपनीने 1 हजार 336 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे.









