सावंतवाडी/प्रतिनिधी-
शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱया आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शक्षक संघ सावंतवाडी शाखेतर्फे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी संघटनेचे माजी मार्गदर्शक गुरुवर्य कै. दशरथ दत्ताराम गोडकर यांच्या स्मृतीा प्रित्यर्थ त्यांच्या गोडकर कुटुंबियाच्या सहकार्याने आखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शक्षक संघ सावंतवाडीच्यावतीने शासकी शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या उच्च उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी) व पूर्व माध्यामिक शिष्यवृत्ती परीक्षा (8 वी) विद्याथ्यासाठी शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक केंद्रस्तरावर शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्याथ्यानी या सराव परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल प्राथामिक शिक्षक संघाचे संयुक्त सरचिटणीस म.ल.देसाई यानी केले आहे. स्व. दशरथ गोडकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष रस होता. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्याथ्यानी शिष्यवृत्ताr प्राप्त केली आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गोडकर कुटुंबियातर्फे हि परीक्षा पुरस्कृत केली आहे. पाचवी व आठवीतील `टॉप टेन’ विद्यार्थ्यांना रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. या सराव परीक्षेच्या आयोजनाबद्दल सावंतवाडी सभापती सौ. सावंत, उपसभापती शीतल राऊळ, गटशिक्षणाधिकारी सौ. कल्पना बोडके यांनीं कौतुक केले आहे.









