-महापालिका त्रिसदस्यीय प्रभाग रचनेचा परिणाम
विनोद सावंत/कोल्हापूर
महापालिकेची निवडणूक आता त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार आहे. सध्याचे असणारे तीन प्रभागाचा एक प्रभाग होण्याची शक्यता वर्तवली जात असून सुमारे 20 हजार मतदारांचा एक प्रभाग असेल असे सांगितले जाते. राज्य मंत्रिमंडळाचा हा बहुसदस्यीय प्रभागाचा निर्णय जरी पक्षीय पातळीवर फायदेशीर ठरणार असला तरी तो प्रस्थापितांच्याही पथ्यावर पडणार आहे. त्यांचे निवडणुकीचे गणित सोपे झाले असून नवख्या, ताज्या दमाच्या उमेदवरांचे मात्र, अवघड झाले आहे.
राज्य सरकारने महापालिकेच्या निवडणुका त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतल्याने महापालिकेची एक सदस्यीयवरून बहुसदस्यीय प्रभाग रचना होणार आहे. त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सहकारी संस्थामध्ये जसे पॅनेल पद्धत असते तशीच रचना महापालिकेत होणार आहे. गेली 20 ते 25 वर्ष नगरसेवक म्हणून निवडून येत प्रस्थापित, शक्तीशाली बनलेल्यांचा प्रत्यक्ष निवडणुकीचा पेपर यामुळे सोपा झाला आहे. आरक्षणामुळे ते यापूर्वी आजुबाजुच्या प्रभागातून निवडून आले आहेत. येथील संपर्काचा फायदा त्यांना नजीकच्या काळात होणार आहे. नवख्यांना मात्र, कष्ट उपसावे लागणार आहेत.
आघाडी की स्वतंत्र
सध्या महाविकास आघाडीमध्य काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असे तीन पक्ष आहेत. तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास एका प्रभागात ते तीन उमेदवार देऊ शकतील अथवा स्वतंत्र लढल्यास तीन स्वतंत्र उमेदवार द्यावी लागणार आहेत. भाजप-ताराराणी आघाडी नेमकी काय करणार? याकडेही राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत.
इच्छुकांचे श्रम आणि खर्च वाया
गेल्या वर्षभरापासून काही इच्छुकांनी निवडणूक डोळÎासमोर ठेऊन खिसा रिकामा केला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी देवदर्शन, जेवणावळÎा, गिफ्ट वाटप केले आहे. आता आरक्षण आणि प्रभाग रचना बदलणार असल्याने त्यांचे श्रम आणि खर्च वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तगडे उमेदवारच रिंगणात, अपक्षसमोर आव्हान
बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय तीन प्रभागात पकड असणाऱया तसेच आर्थिकदृष्टीय, राजकीयदृष्टÎा सक्षम असणाऱया उमेदवारच्या पथ्यावर पडणार आहे. यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचे येथे राजकीय, आर्थिक गणित कोलमडणार आहे. 20 हजार मतदारांपर्यंत पोहोचणे, मंडळांचा पाठींबा मिळवण्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागणार आहेत. यामुळे साम, दाम, दंड आणि भेद याची क्षमता असणारे तगडे उमेदवारच रिंगणात राहतील, असा अंदाज राजकीय पंडीत वर्तवत आहेत. परिणामी इच्छुकांची संख्या घटण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्षाला डिमांड
त्रिसदस्यीय पद्धतीमुळे पक्षीय राजकारणाला महत्व वाढणार आहे. ज्या उमेदवाराकडे पक्षाची ताकद असेल त्याचे पारडे जड असणार आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरणाऱयाचा प्रवास खडतर असणार आहे. यामध्ये कोणी सक्षम अपक्ष उमेदवार असेल त्याचा टिकाव लागणार असे सध्या तरी चित्र आहे.
प्रस्थापित नगरसेवकाचा प्रभागात राहणार वरचष्मा
सध्या एक सदस्यमुळे एका प्रभागात एकच नगरसेवक असतात. प्रभागातील कामाबाबत ते पाठपुरावा करतात. त्रिसदस्यीय पद्धतीमुळे प्रभाग एक आणि नगरसेवक तीन असे चित्र असणार आहे. त्यामुळे विकासकामात त्यांच्यामध्ये स्पर्धा रंगणार आहे. नवख्या नगरसेवकापेक्षा प्रस्थापित नगरसेवकाचे प्रभागात वरचेष्मा राहणार आहे. विरोधात गेलेल्या मतदारांच्या कामावरून त्यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे.









