प्रतिनिधी / वारणानगर
येथील निवृत्ती कॉलनीतील संजीत मेमोरियल हॉस्पीटल, गॅलेक्सी हॉस्पीटलचे चेअरमन, देशाच्या ग्रामीण भागात पाहिले टेस्टट्यूब बेबी सेंटर निर्माण करून महिलांना टेस्टट्यूबच्या माध्यमातून मातृत्व देणारे वारणा परिसरातील प्रसिध्द स्त्रीरोगतज्ञ डॉ. आनंद गजानन कोरे वय ५९ यांचे आज मंगळवारी सकाळी ह्रदय विकाराने निधन झाले त्यांच्या निधनामुळे वारणा परिसरासह वैयकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
जुन्या काळात पहिले एम.बी.बी.एस. डॉक्टर म्हणून डॉ. गजानन कोरे यांनी वारणा परिसरातील जनतेला आरोग्यसेवा दिली वडिलांच्या या आदर्शावर वाटचाल करीत डॉ. आनंद कोरे यानी पत्नी डॉ. सुचेता कोरे या उभयतानी वारणानगर ता. पन्हाळा येथे संजीत मेमोरियल व कोरे हॉस्पीटलची स्थापना केली या ठिकाणी महिलावरील प्रामुख्याने सर्व उपचार होत होते या सेवेत मातृत्वा पासून वंचीत रहाणाऱ्या महिलासाठी टेस्टट्यूब बेबी सेंटरची स्थापना करून या सेंटरच्या माध्यमातून शेकडो महिलांना मातृत्व दिले आहे.
वारणा परिसरातील ग्रामीण भागातील जनतेला इतर अजारावर उपचार करण्यास शहरात जावे लागत होते यासाठी सर्व सोयिनीयुक्त गॅलेक्सी हॉस्पीटलची स्थापना करून ग्रामीण भागात सर्व आरोग्यसेवा एकाच छतासाली त्यानी सुरू केल्या याचा परिसराला चांगला लाभ होत आहे.
शांत,संयमी, मितभाषी प्रेमळ स्वभावाचे असणारे डॉ. आनंद कोरे सर्वाना दिलासा देणारे डॉक्टर होते वैद्यकीय क्षेत्रातील सर्व आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून सर्वोकृष्ट वैद्यकीय सेवा देण्यात त्यानी सातत्य राखले आम्ही ज्या मातीत जन्मलो त्या वारणा परिसराला आम्ही सेवा दिली पाहिले या कर्तव्य भावनेने त्यानी आजवर आरोग्य सेवा दिली आहे. डॉ. आनंद कोरे यांच्या पत्नी, दोन मुले देखील उच्च शिक्षीत डॉक्टर असून ते देखील रुग्णांना आरोग्य सेवा देत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









