प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावचे उद्योजक प्रसन्ना घोटगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मित्र मंडळींनी सामाजिक बांधिलकी जपली. शहरातील विविध आश्रमांमध्ये जाऊन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. उद्योजक घोटगे यांच्या मित्र मंडळींनी अनोख्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा केला.
टिळकवाडी येथील आर्ष विद्या केंद्र, कणबर्गी येथील महेश फौंडेशन, रेलनगर येथील नंदन मक्कळ धाम, वडगाव येथील अनमोल तंगुधाम, गंगम्मा चिकुंबी मठ, सिद्धार्थ बोर्डिंग, शांताई वृद्धाश्रम, माऊली आश्रम, फादर ऑफ संगरगाळी स्कूल, गणेशपूर येथील लोमॅक्स आश्रम, शहापूर येथील निराधार आश्रीत केंद्र, शंकर पाटील मित्रमंडळ, हेल्प फॉर निडी यासह विविध संघटनांना मदत करण्यात आली.
गॅलॅक्सी हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमाबद्दल परशुराम नंदिहळ्ळी यांनी कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा. भरमा कोलेकर यांनी तर विजय मोरे यांनी स्वागत केले. रामनगरचे जि. पं. सदस्य संजय हणबर, उमेश कलघटगी, समीर केशकामत, नंदकुमार कंग्राळकर, प्रशांत दंडकार आदी यावेळी उपस्थित होते. सुरेंद्र अनगोळकर व शंकर पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. विविध संस्थांच्या पदाधिकाऱयांनी प्रसन्ना घाटगे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.









