व्यापाऱ्यांची ग्वाही; शहर पोलीस ठाण्यात बैठक
प्रतिनिधी / सांगली
व्यापाऱ्यांनी नेहमीच प्रशासनाला सहकार्य केले आहे. प्रशासनाच्या आदेश नियमावलीच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलले नाही यापुढेही प्रशासनाचा अधिकृत आदेश आल्याशिवाय दुकाने उघडणार नाही, अशी ग्वाही व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान दुकाने सुरु करण्याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. लवकरच याबाबत निर्णय होईल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सयंम ठेवावा असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शेखर माने यांनी व्यापाऱ्यांना केले.
प्रशासनाचा आदेश डावलून महापालिका क्षेत्रातील दुकाने उघडण्याचा इशारा काही व्यापाऱ्यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिस ठाण्यात व्यापारी असोशिएशनचे पदाधिकारी, पोलिस अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शेखर माने, रेडिमेड गारमेंट कापड असोशिएशनचे शामजीभाई पारीख कापड पेठ असोशिएशनचे हरीष लालन, सराफ असोशिएशनचे सचिव पंढरीनाथ माने, गणपती पेठ असोशिएशनचे बाळासाहेब खेराइकर मारुती रोह व्यापारी असोशिएशनचे तांबोळी, मोबाईल असोशिएशनचे अजिंक्य घारप यांच्यासह अन्य पदाधिकारी, व्यापारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर म्हणाले, व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने उघडता येणार नाहीत. व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन कराये प्रशासनाला सहकार्य करावे एकाही व्यापायाला त्रास होणार नाही. यावेळी परिस्थिती बिकट असूनही व्यापाऱ्यांनी प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले आहे. नियमांचे उल्लंघन केलेले नाही. यापुढेही नियमांचे उल्लंघन होणार नाही. जो पर्यंत जिल्हा प्रशासनाचा अधिकृत आदेश येत नाही, तोपर्यंत दुकाने उघडणार नाही, अशी याही व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
Previous Articleराणेंची क्षमता पाहून केंद्रीय मंत्रिपद दिलं ; भाजप-शिवसेना युतीवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Next Article मिरजेत आढळले मृतावस्थेतील हरीण








