अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 22 ऑगस्ट 2021, स. 11.00
● जिल्हावासियांमध्ये संताप
● आकडेवारीचा लागेना मेळ
● मृत्यूच्या वाढत्या आकड्याने भीती
● संवाद साधण्यात प्रशासन कमी
● रविवारी रात्री अहवालात 692 बाधित
● एकूण 13,603 जणांची तपासणी
● जिल्ह्यात 3,112 बेड रिक्त
सातारा / प्रतिनिधी :
गत महिन्यापासून पाचशे, सहाशे, आठशे, हजार असा बाधित वाढीचा आलेख खाली वर होत जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. यामध्ये अधूनमधून वाढणारे मृत्यूचे आकडे नागरिकांसाठी भयावह ठरत आहेत. ही आकडेवारी ज्या पद्धतीने अपलोड केली जात आहे, त्या प्रशासनाच्या कामाबद्दल आता जिल्हावासियामध्ये संताप व्यक्त होऊ लागलेला आहे. कारण शनिवारच्या अहवालात दाखवण्यात आलेले 54 जणांच्या मृत्यूच्या आकड्याने नागरिक पॅनिक झाले आहेत. ही आकडेवारी नेमकी कधीची ती तारीख, वयासह जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
शनिवारी अहवालात 692 बाधित
शनिवारी रात्री प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अहवालात एकूण 13,603 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. यामध्ये 692 जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती देण्यात आली असून, नेहमीप्रमाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर किती याची नोंद त्या अहवालाच्या माहितीमध्ये नाही. दरम्यान वाढीचा वेग मंदावला असला तरी तो अद्याप थांबत नसल्याने या स्थितीचा आता गांभीर्याने आढावा घ्यावा लागणार आहे.
54 मृत्यू? चाललंय काय जिल्ह्यात?
शनिवारी आलेल्या अहवालात संपूर्ण देशात एकूण मृत्यू 375 आणि त्यातले सातारा जिल्ह्यात 54 मृत्यू म्हणजे नेमका काय प्रकार आहे? असा सवाल नागरिकांनी जिल्हा माहिती कार्यालयाने त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलेल्या बातमी खाली केला आहे. अनेक नागरिक त्यावर व्यक्त झालेले असून प्रशासन झोपा काढ़त आहात काय? असा सवाल एका नागरिकाने केलेला आहे. तो जरा प्रशासनाने पाहून घ्यावा. चार ते पाच वेळा अशा प्रकारे मोठ्या संख्येने मृत्यूची आकडेवारी येत असल्याने याबाबत ‘तरुण भारत’ने मागच्या वेळी पुराव्यासह त्या दिवशी अहवालात देण्यात आलेले 42 मृत्यू हे विविध दिवशीचे असल्याचे मांडले होते. प्रशासनाला नागरिकांना दिलासा द्यायचा आहे की घाबरवायचे आहे असा सवाल नागरिक करत आहेत.
प्रशासनाकडून शून्य कारवाई
त्यावेळेस सातारा जिल्हा शल्य चिकित्सक यांनी याबाबत माहिती घेऊन मृत्यूचा अहवाल उशिरा पाठवणाऱ्या हॉस्पिटल कारवाई करण्याचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर हा प्रकार म्हणजे ,बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असा ठरला अद्याप पर्यंत आकडेवारी मध्ये घोटाळा करणाऱ्या वर कोणतीही कारवाई प्रशासनाने केलेली नाही. आणि त्यानंतरही अनेक वेळा मृत्यूचे आकडेवारी मोठी येत असून हे सर्व मृत्यू एका दिवसातील नाहीत तसेच यामध्ये अधिक तर ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असल्याने हे नक्की कोरोना बळी कशावरून ठरवता असाही सवाल आता नागरिक करत आहेत.
आकडेवारीचा लागेना मेळ, प्रशासनाचा खेळ
आयसीएमआरच्या कोव्हीड पोर्टलवरील माहिती जी प्रेस इन्फर्मेशन ब्युरो यांनी काल रात्री प्रकाशित केली त्यानुसार सातारा जिल्ह्यात उपचारार्थ रुग्णांची संख्या 6,658 इतकी आहे. आणि जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये जिल्ह्यात तब्बल दहा हजारांच्या पुढे उपचारार्थ रुग्ण संख्या दाखवली जात आहे हे म्हणजे नेमके काय ? तर गेल्या 11 दिवसांतील बाधितांची संख्या 8,300 च्या आसपास आहे तर मग उपचारार्थ बाधित रुग्ण 10,251 कसे असू शकतील? चुकीचे रिपोर्ट प्रकाशित करण्यापूर्वी असे रिपोर्ट बनविणाऱ्यांनी कमीत कमी गणित, आकडेमोड तरी करून पहावी, असाही सल्ला प्रशासनाच्या जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबूक पेजवरील प्रतिक्रियांमध्ये देण्यात आलेले आहे. आता तरी प्रशासनाने नागरिकांचा फार अंत न पाहता पारदर्शकपणे काम करण्याची गरज परिस्थिती देत आहे.
राज्यभरात कोरोना आटोक्यात पण…
राज्यभरातील अनेक जिल्हे कोरोना मुक्त झालेले आहेत व होत आहेत तर पुण्या-मुंबईसारख्या कार्पोरेट शहरांमध्ये देखील कोणाची साथ आटोक्यात आलेली आहे असे असताना पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्हा मध्ये नेमकं काय चाललेले आहे. याकडे राज्य शासनाचे, राज्य व केंद्रीय कोविड टास्क फोर्सचे लक्ष दिसत नाही. सातारा जिल्ह्यात तीन महिन्यापासून तीन अंकी संख्येने सुरू असलेली वाढ पाहता आणि गेल्या दीड महिन्यापूर्वी ती आटोक्यात आणण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री आलेले असताना देखील पुन्हा सातारा जिल्ह्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर अद्यापही कायम आहे. आकडेवारीच आहे घोळ सुरूच आहे प्रशासन कोणत्याही प्रकारे संवाद साधत नसल्याने पारदर्शकता कमी झाली आहे.
शनिवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमूने….16,59,191
एकूण बाधित….2,33,995
एकूण कोरोना मुक्त… 2,20,948
मृत्यू…5,760
उपचारार्थ रुग्ण…10,262
शनिवारी जिल्ह्यात
बाधित….623
मुक्त…612
बळी….54









