व्यावसायिक वाहन विक्रीत घसरण : एसआयएएमची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सध्या देशासोबत सारे जग कोविड 19 च्या प्रभावामुळे प्रभावीत झाले आहे याला ऑटोमोबाईल उद्योगही बळी पडला आहे. लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात प्रवासी वाहनांची देशातील विक्री 51 टक्क्मयांनी घसरली आहे. मागील महिन्यात 1 लाख 43 हजार 14 इतके वाहने विकली आहेत. हा आकडा मागील वर्षातील मार्च महिन्यात 2 लाख 91 हजार 861 युनिट्वर राहिला होता. प्रवासी वाहनांसोबत व्यावसायिक वाहनांची विक्री 88.95 टक्क्मयांनी घटून 13 हजार 27 वर राहिली आहे. मार्च 2019 रोजी 1 लाख 9 हजार 22 वाहने विक्री झाली होती, अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चर्स(एसआयएएम) यांनी दिली आहे.
सर्व प्रकारच्या वाहनांची विक्री
मार्च महिन्यात झालेल्या सर्व प्रकारच्या वाहनात दुचाकी वाहनांची एकूण विक्री 39.83 टक्क्मयांनी कमी झाली आहे. मागील महिन्यात 8 लाख 66 हजार 849 इतक्मया दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. तर मार्च 2019 रोजी हा आकडा 14 लाख 40 हजार 593 इतका होता. तर सर्व प्रकारातील वाहनांची एकूण विक्री 44.95 टक्क्मयांनी घसरुन 10 लाख 50 हजार 367 वर राहिली. मागील मार्च मध्ये 19 लाख 8 हजार 97वर स्थिरावली होती.
मार्ग शोधण्याची चर्चा
एसआयएएमचे अध्यक्ष राजन बढेरा यांच्या माहितीनुसार उद्योग व सरकार यांच्यात विविध विषयावर चर्चा केली जात असल्याचे सांगितले आहे. यासाठी एक योजना आखून वाहन क्षेत्राला कोविड 19 पासून बळकटी देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. एसआयएएमच्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या काळात प्रतिदिन वाहन क्षेत्राला 2,300 कोटी रुपये प्रोडक्शन टर्नओव्हर इतके नुकसान होत असल्याचे संकेत मांडले आहेत.









