प्रतिनिधी/ सातारा
नव्याने बांधण्यात येणाऱया शिवाजी संग्रहालयाच्या परिसरात खाजगी प्रवासी वाहने उभी राहत होती. यामुळे प्रवाशी वाहनांना नियम लावण्याची मागणी शिवप्रेमीकडून जोर धरू लागली. यावर प्रशासनाने पावले उचलत मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे.
एसटी स्टॅड शेजारील हजेरीमाळ या मैदानावर नव्याने शिवाजी संग्रहालय बांधण्याचे काम सुरू आहे. संग्रहालयासोबत परिसरात संरक्षण भीतीही बांधण्यात येत आहेत. काम पुर्ण होईपर्यंत सर्वाना प्रवेश बंद ठेवला आहे. मात्र रस्त्यालगत उभ्या असणाऱया खाजगी प्रवासी वाहनांचा मनमानी करभार वाढला होता. ही प्रवासी वाहने शिवाजी संग्रहालयाच्या परिसरात उभी करण्यात येत होती. एकावेळी पाच-सहा वाहने उभी राहिल्याने संग्रहालय हे पार्किंग पाईंट बनले होते. तसेच खाजगी ट्रव्हर्ल्स चालकही संध्याकाळच्या वेळी परिसरात गाडया दुरूस्तीची कामे करत असत. यामुळे शिवप्रेमींनी या वाहनधारकांवर कारवाई करत यांना नियम लावण्याची मागणी केली होती. दरम्यान प्रशासनाने पावले उचलत या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारात कळक बांधून मुख्य मार्ग बंद केला आहे. यामुळे चार दिवसापासून एकही प्रवासी वाहन संग्रहालयाच्या परिसरात उभे राहिले नाही. यामुळे शिवप्रेमीकडून आनंद व्यक्त होत आहे.
प्रवेशद्वारात खड्ड…
शिवाजी संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. यावेळी माल वाहतूक करणारे ट्रक यांची सारखी ये-जा सुरू असते. काही दिवसापुर्वी असाच ट्रक संग्रहालयाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना खड्डा पडला होता. तो खड्डा अद्याप भरून काढला नाही. यामुळे अपघात होईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मात्र याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.









