प्रतिनिधी/सांगली
पुणे येथे बालगंधर्व नाट्यमंदिरमध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रबोधन या मासिकाच्या शताब्दी सोहळ्याचे उदघाटन झाले. या कार्यक्रमावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सत्यशोधक डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते शिवसेना सांगली जिल्हा संघटक बजरंग पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
मिरज तालुक्यातील काकडवाडी या छोट्याशा गावामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांची दुर्मिळ ग्रंथसंपदा जतन करून ठेवण्यात आली आहे. काकडवाडी येथे काही वर्षापूर्वी उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी भेट दिली होती. या ग्रंथसंपदेचे डिजिटलायझेशन करण्याची मागणी होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे या कामाला वेग येईल अशी आशा व्यक्त होत आहे.
या सोहळ्यास विधानपरिषद उपसभापती व शिवसेना उपनेत्या निलमताई गोऱ्हे, शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक आणि काकडवाडीचे महावीर मुळे , दिनकर पाटील, विनायक पाटील, गणेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








