नवी दिल्ली / वृत्तसंस्था
चीनमधील भारताचे नवीन राजदूत प्रदीप कुमार रावत यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. भारतीय दूतावासाने ट्विट करून ही माहिती दिली. रावत यांच्या पूर्वी विक्रम मिसरी हे चीनमध्ये भारताचे राजदूत होते. डिसेंबर 2021 मध्ये रावत यांची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी रावत यांनी नेदरलँडमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. भारत-चीनमधील वाढत्या तणावाच्या आणि द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर राजदूतपदाची धुरा महत्त्वाची मानली जाते.









