ऑनलाईन टीम / मॉस्को :
भारत सरकारने काही दिवसांपूर्वीच रशियाच्या ‘स्पुतनिक-व्ही’ या लसीला भारतात मंजुरी दिली आहे. या लसीची पहिली खेप 1 मे रोजी भारतात दाखल होणार आहे. रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे प्रमुख किरील दिमित्रिक यांनी यासंदर्भात माहिती दिली.
दिमित्रिक म्हणाले, रशियाने भारताला लस पुरवठा करण्यासाठी करार केला आहे. त्यानुसार 50 दशलक्ष डोस येत्या काही दिवसात भारताला दिले जातील. भारताला या लसीचे एकूण 8.5 कोटी डोस मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’चे लसीकरण सुरू आहे. आता ‘स्पुतनिक-व्ही’ ची पहिली खेप भारतात दाखल झाल्यानंतर लसीकरणाला गती मिळणार आहे. रशियाची ही लस गॅमलेया रिसर्च सेंटर आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड या संस्थांनी मिळून तयार केली आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून सिद्ध झाले आहे.








