वृत्तसंस्था / मेलबोर्न
येथे होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्याकरिता सुरू असलेल्या पात्र फेरीच्या स्पर्धेत भारताच्या प्रज्नेश गुणेश्वरनने पुरूष एकेरीची दुसरी फेरी गाठली आहे तर भारताच्या रामकुमार रामनाथनचे आव्हान पहिल्या फेरीत समाप्त झाले. महिलांच्या विभागात भारताच्या अंकिता रैनाला हार पत्करावी लागली.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात प्रज्नेशने ऑस्ट्रेलियाच्या बोर्चेरचा 6-2, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. प्रज्नेशचा दुसऱया फेरीतील सामना जर्मनीच्या हेनफिमेनशी होईल. दुसऱया एका सामन्यात अर्जेंटिनाच्या खेळाडूने रामकुमारचा 4-6, 6-4, 6-1 असा पराभव केला. महिलांच्या विभागात बल्गेरियाच्या टोमोव्हाने अंकिता रैनाचा 6-2, 7-6 (7-2) असा पराभव करत पुढील फेरी गाठली.









