50 दिवसांच्या टाळेबंदीत भारतीय बँकिंग यंत्रणेने एक नवा विक्रम नोंदविला आहे. विविध बँकांच्या खातेधारकांच्या घरांपर्यंत पोस्टमनद्वारे 1 हजार कोटी रुपयांची रोख रक्कम पोहोचविण्यात आली आहे. ही रक्कम टाळेबंदीच्या कालावधीतील पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक खात्यांच्या (पीओएसबी) 66,000 कोटी रुपयांच्या व्यतिरिक्त आहे.
ग्राहकांच्या दरवाजापर्यंत रोख रक्कम पोहोचविण्याप्रकरणी उत्तरप्रदेश आणि बिहार पोस्टल सर्कल आघाडीवर आहेत. दोन्ही राज्यांनी या कालावधीत अनुक्रमे 274 कोटी आणि 101 कोटी रुपये थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविले आहेत. तर पहिल्या राज्यांमध्ये गुजरात, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश यांचा समावेश आहे.
23 मार्च ते 11 मेदरम्यान 59 लाख व्यवहारांच्या अंतर्गत 1,051 कोटी रुपये घरांपर्यंत पोहोचविण्या आले. मुख्यत्वे ही रक्कम कंटेन्मेंट झोन्स, मायग्रंट कॅम्पस आणि हॉटस्पॉट्समध्ये पोहोचविण्यात आली आहे. यातही 20 लाख व्यवहार आधारशी संलग्न पेमेंट सिस्टीमद्वारे करण्यात आली आहेत. यातही उत्तरप्रदेशचा वाटा एक तृतीयांश राहिला आहे.
2 लाखांपेक्षा अधिक पोस्टमन्सनी टाळेबंदीत घरांमध्ये कैद लोकांपर्यंत रोख रक्कम पोहोचविली आहे. या कामासाठी 1.36 लाख पोस्ट ऑफिसेस आणि 1.86 एईपीएस उपकरणांचा वापर केला जातोय. एईपीएस सध्या गेमचेजिंग पुढाकाराच्या स्वरुपात उदयास आले आहे. त्याच्यामुळे दुर्गम गावांमधील लोकांना घरातच पैसा मिळू लागला असल्याचे उद्गार केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काढले आहेत.









