प्रतिनिधी/ बेळगाव
ग्रामीण डाक सेवकांना नोकरीत कायम करा यासह जुनी पेन्शन लागू करा विविध मागण्यांकरिता गुरुवारी पोस्ट कर्मचाऱयांच्या संघटनांनी संप यशस्वी केला. यामध्ये तीनशे-चारशे पोस्ट कर्मचारी व ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले होते मुख्य पोस्ट कार्यालयाच्या समोर या सर्व कर्मचाऱयांनी आपल्या मागण्या लावून धरल्या होत्या.
केंद्र सरकारने पोस्ट कर्मचाऱयांसाठी सुरू केलेली एनपीएस पेन्शन स्कीम बंद करून त्याऐवजी जुनी पेन्शन सुरू करावी अशी मागणी केली यचबरोबर ग्रामीण डाक सेवकांना नोकरीत कायम करावे व कर्मचाऱयांचे पगार वाढ करावी कमलेश चंद्र आयोगाच्या सर्व मागण्या पूर्ण करावे यासह इतर मागण्या आंदोलकांनी केल्या कर्मचाऱयांनी केंद्र सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.
कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयाच्या समोर कर्मचाऱयांनी आंदोलन केले एवढी धर्मेश जाई रवी पाटील गुंडप्पा मनगटी किशोर देशपांडे अशोक सुतार पीएस कल्पत्री शंकर पाटील मारुती दळवी उदय देसाई धर्माचे अंतरकर या सर्व मोठय़ा संख्येने पोस्ट कर्मचारी व ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले होते.









