प्रतिनिधी /काणकोण
काणकोणच्या पोलिसांनी पोळे चेकनाक्यावर एका मालवाहू वाहनात पानमसाल्याच्या गोण्या पकडल्या असून त्यांची बाजारात 32 लाख 90 हजार 282 रु. इतकी किंमत भरते, अशी माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक प्रवीण गावस पंनी दिली. त्याशिवाय 90 हजार 282 रु. किमतीचा तंबाखू आणि सदर मालवाहू वाहन काणकोणच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वाहन आणि पकडलेला माल मिळून एकूण 53 लाख 59 हजार रु. किमतीचा ऐवज सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणी वाहनमालक महानतेश चलगेरी आणि त्यांच्या मदतनिसाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून निरीक्षक गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामचंद्र नाईक पुढील तपास करत आहेत.









