प्रतिनिधी / मडगाव
अनेक पोलीस स्थानकात आपल्या कर्तृत्वाने छाप पाडलेले पोलीस खात्यातील उपनिरीक्षक तुळशीदास नाईक यांना खात्याने पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.
शांत स्वभावाचे आणि प्रसंगी तितकेच कठोर असलेले श्री. नाईक यांनी मडगाव, कोलवा यासारख्या अनेक पोलीस स्थानकात काम केलेले असून सध्या ते पणजी पोलीस स्थानकाकडे संलग्न आहेत. त्यांच्या या बढतीच्या आदेशाचे अनेक संघटनानी स्वागत केलेले आहे.









