

प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक पोलीस सेवेतील बाराहून अधिक अधिकाऱयांना आयपीएसपदी बढती मिळाली असून त्यामध्ये बेळगावचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख अमरनाथ रेड्डी, लोकायुक्त विभागाच्या यशोदा वंटगोडी यांचा समावेश आहे. शुक्रवारी या संबंधीचा आदेश जारी करण्यात आला आहे. याबरोबरच यापूर्वीचे अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख रविंद्र गडादी, गुप्तचर विभागाचे चन्नबसवण्णा लंगोटी, मुत्तुराज एम. आदींनाही आयपीएसपदी बढती मिळाली आहे.









