प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे विवाह समारंभ रद्द करण्यात आले होते. मात्र, आता पोलिसांची परवानगी घेऊन 15 जणांच्या उपस्थितीत विवाह करण्यास मुभा देण्यात आली आहे. ज्या कोणाला विवाह करायचा आहे त्यांनी लग्नपत्रिका जोडून पोलीस आयुक्त कार्यालयात द्यावी, त्या ठिकाणी रितसर परवानगी दिली जाईल, असे सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱयांना परवानगीबाबत निवेदन देण्यासाठी काही जण आले असता त्यांना ही माहिती देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे विवाह समारंभांबरोबरच इतर सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले होते. मात्र, काही जणांचा विवाह ठरला होता. मात्र, कोरोनामुळे विवाह करणे अशक्मय झाले होते. काही जणांनी लग्नपत्रिका छपाई केल्या होत्या. मात्र विवाह रद्द करावा लागला आहे. सोमवारी काही जणांनी जिल्हाधिकाऱयांकडे धाव घेतली. त्यावेळी ही समस्या सांगण्यात आली. शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी वरि÷ अधिकाऱयांशी चर्चा केली. त्यावर पोलिसांकडून परवानगी घेऊन विवाह करण्यास मुभा देण्यात आली. यावेळी सुनील जाधव, किरण हणमंताचे, भैय्या होसूरकर, विकी कामाण्णाचे यांच्यासह इतर तरुण उपस्थित होते..









