ऑनलाईन टीम / वारसॉ :
पोलंडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या देशात आतापर्यंत 9 लाख 99 हजार 924 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 17 हजार 599 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
सोमवारी या देशात 5741 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 121 जणांचा मृत्यू झाला. 9.99 लाख रुग्णांपैकी 5 लाख 97 हजार 589 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 3 लाख 84 हजार 736 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2032 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत पोलंडचा जगात तेरावा क्रमांक लागतो. येथे आतापर्यंत 62 लाख 75 हजार 392 नमुन्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.









