वार्सा : पोलंडमध्ये दुसऱया महायुद्धाच्या काळातील सर्वात मोठा बॉम्ब मंगळवारी निष्क्रीय करताना त्याचा स्फोट झाला आहे. पोलंडच्या नौदलाचे डायव्हर्स बॉम्ब निष्क्रीय करण्यासाठी कालव्यातील पाण्यात घेऊन गेले होते. कालव्यात उतरलेले सर्व डायव्हर्स स्फोटापूर्वीच जोखिमक्षेत्रातून बाहेर पडले होते.
दुसऱया महायुद्धादरम्यान वापरले गेलेल्या या बॉम्बचे नाव टॉल बॉय होते. सप्टेंबर 2019 मध्ये पोलंडच्या जेकिन शहरातील नाल्याची खोदाई करताना हा बॉम्ब सापडला होता. दुसऱया महायुद्धादरम्यान ब्रिटनचे रॉयल एअरफोर्स या बॉम्बचा वापर करत होते. याचे एकूण वजन 5,400 किलोग्रॅम होते आणि यात 2,400 किलो वजनाची स्फोटके भरलेली होती.
बॉम्बमुळे कुठलाच धोका नाही
बॉम्ब निष्क्रीय करण्यापूर्वी कालव्याच्या परिसरातून 750 लोकांना हटविण्यात आले होते. बॉम्ब डिफ्लॅगरेशन प्रक्रियेतून निष्क्रीय करण्याची योजना होती, परंतु तो त्यापूर्वीच डेटोनेट झाला आहे. स्फोट झाल्याने तो आता पूर्णपणे निष्क्रीय झाला आहे. आता त्याच्यापासून कुठलाच धोका नसल्याचे नौदलाचे प्रवक्ते ग्रिगोर्ज लेवेंडोस्की यांनी सांगितले आहे.
पोलंडची सर्वात मोठी मोहीम
पोलंडमध्ये दुसऱया महायुद्धाच्या काळातील स्फोट न झालेले असे अनेक बॉम्ब, क्षेपणास्त्रs आणि ग्रेनेड मिळाले आहेत. परंतु ही आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम होती. या बॉम्बची निर्मिती ब्रिटिश एअरोनॉटिकल इंजिनियर बार्न्स वॅलिस यांनी केली होती.
कारण अद्याप अस्पष्ट
रॉयल एअरफोर्सने 1945 मध्ये जर्मन क्रूजर लुटजोवर हल्ला करण्यासाठी हा बॉम्ब पाडविला होता. सर्वसाधारपणे जर्मनीच्या नाझी सरकारच्या मालमत्ता नष्ट करण्यासाठी असे हल्ले केले जात होते. अखेर आतापर्यंत या बॉम्बचा स्फोट का झालेला नाही याचे कारण तज्ञांना समजू शकलेले नाही.








