प्रतिनिधी / म्हापसा
कॅनेडीयन राष्ट्रीय नागरिक क्लाउड बोल्डीक (59) हा कांदोळी येथील एका गेस्ट हाऊसमध्ये राहत होता मात्र लॉकडाऊनमुळे 18 मार्चपासून सर्व काही बंद झाल्याने पैसे अभावी तो बंद शॅकमध्ये राहू लागला. मात्र पैसे अभावी त्याला काहीच मिळत नसल्याने त्यानी कळंगूट पोलीस स्थानक गाठून घटनेची माहिती निरीक्षक नालास्को रापोझ यांना दिली. निरीक्षक रापोझ यांनी याबाबत म्हापसा उपजिल्हाधिकारी अक्षय पोतेकर यांची भेट घेतली व सर्व माहिती कथित केली. त्यांच्या आदेशानुसार त्या कॅनेडीय नागरिकाला अखेर कळंगुट निवासी घरात ठेवण्यात आले आहे. येत्या 4 मे रोजी त्याला लॉकडाऊन संपल्यावर त्यांच्या गावात पाठविण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली









