पेडणे (प्रतिनिधी ) पेडणे तालुक्मयात चांदेल हसापूर तसेच हणखणे गावात मंगळवारी सायंकाळी 4.45 च्या दरम्यान चक्रीवादळ होऊन या वादळात अनेक झाडे मोडून घरावर पडल्याने आणि सुसाट वा-यामुळे केळी बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

मंगळवारी सायंकाळी पावसाचे ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 4.39 नंतर काही ठिकाणी पेडण्यात पाऊसाने अंधार झाला.याच दरम्यान 4.45 च्या सुमारास चांदेल हसापूर पंचायत क्षेत्रात तसेच हणखणे भागात चरीवादळाचा तडाखा बसला सुटाट वारा आणि पाऊस पडल्याने काही क्षणातच हसापूर येथे वा-याने झाडे मोडून घरावर पडली.तर दहा वीज खांब झाडे पडून मोडली.हसापूर येथे सुभाष मळिक यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
सुभाष मळिक यांच्या केळी बागायतीतील सुमारे 600 मंडोळी केळीची झाडे मोडून पडल्याने लाखो रुययांचे नुकसान झाले. या वादळात किशोर मळिक यांची महिद्रा जीप व अॕक्टीवा दुचाकी गाडी झाड मोडून पडल्याने मोठे नुकसान झाले. हसापूर येथील ब्राह्यण देवस्थान चा पिंपळाचे झाड वीज वाहिन्यावर पडून वीज वाहिन्या तुटला.यामुळे रस्ता बंद झाला.तसेच नकुळ मळिक यांचे माडीचे झाडे पडून मोठे नुकसान झाले.

चांदेल येथे वीज खांबावर झाडे पडून वीज खांब मोडले. तसेच बागायतीचे नुकसान झाले. हणखणे गावातही चक्रीवादळाचा मोठा फटका बसून खालो रुपयांचे नुकसान झाले. हणखणे येथील शेतकरी आत्माराम नाईक यांच्या केळी बागायती मधील सुमारे 150 मंडोळी केळीची झाडे मोडून पडून हजारो रुपयांची नुकसानी आत्माराम नाईक यांची झाली. गोपाळ नाईक यांचे माड व कोळीची झाडे मोडून नुकसान झाले. घराची छपरे उडून गेली, झाडे घरावर पडून नुकसान
अर्जुन नाईक व राजाराम आरोदेंकर यांच्या घराची कौले उडून गेले. तर गुरुदास कालेकर यांच्या घरावय आंब्याचे झाड पडून तर दयानंद हरिजन यांच्या घरावर फणसाचे झाड पडून घरे मोडल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांची कौले उडून गेल्याने नुकसान झाले. चांदेल – हसापूर चक्रीवादळामुळे झाडे पडल्याने वीज वाहिन्या तुटल्या त्यामुळे या भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसर झाला अंधारमय. सरपंच संतोष मळिक तसेच गावातील ग्रामस्थ यांनी गावात जाऊन झाडे पडलेल्या भागात जाऊन अग्निशमन दलाला झाडे कापून बाजूला करण्यास सहकार्य केले.
हणखणे येथे उपसरपंच कृष्णा नाईक , पंच आत्माराम नाईक तसेच ग्रामस्थानी जाऊन झाडे पडलेल्या घरातील नागरिकाना धीर दिला. पेडणे आग्निशमन दलाला माहिती मिळताच पेडणे आग्निशमन दलाच्या जवानानी घटनास्थळी जाऊन मोडून पडलेली झाडे राञी उशीरा पर्यंत कापून रस्ता तसेच वीज वाहिन्या मोकळय़ा केल्या.









