त्यात मांदे पंचायत क्षेत्रात 14 कोरोना बाधित
पेडणे ( प्रतिनिधी)
पेडणे तालुक्मयात मंगळवारी दिवसभरात नवीन कोरोना बाधित एकूण 33 रुग्ण सापडले. त्यात सर्वाधिक एकादिवसात मांदे पंचायत क्षेत्रात 14 मिळाल्याने या गावात आतापर्यंत कोरोनाचे शतक पार करण्यासाठी उंबरठय़ावर पोचलेले आहे . पेडणे तालुक्मयाचा विचार केल्यास मांदे गाव सुशिक्षितांचा गाव , अनेक युवक नागरिक उच्चशिक्षित उच्चपदावर आहे . जनजागृती निस्वार्थी भावनेने करत असतात . मात्र कोरोनाची संख्या या पंचायत क्षेत्रात वाढत असल्याने नागरिक चिता व्यक्त केली आहे . आतापर्यंत 95 कोरोना बाधितांचा आकडा या पंचायत क्षेत्रात पोचला आहे .
पेडणे तालुक्मयात दिवसभरात मांदे 14 , पार्से 5 , कोरगाव 2 , पेडणे 4 , हरमल 3 , मोरजी 2 , तुये 1, केरी 1 व आगरवाडा 1 मिळून 33 नवीन कोरोना रुग्ण मिळाले .
आता राज्याच्या सीमा खुल्या झाल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्मयता आहे . पूर्वी ज्याना राज्यात प्रवेश करायचा असेल तर त्या नागरिकाला कोरोना अहवाल नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र घेवूनच प्रवेश करावा लागायचा . आता हा नियमच काढून टाकल्यामुळे राज्यातील बाहेर व बाहेरील आत राज्यात येताना कोण सकारात्मक आहे हे कळणे कठीण होणार आहे . ज्याच्या संपर्कात येईल त्याला कोरोना होण्याची भीती आहे . त्यामुळे पेडणे तालुक्मयात कोरोनाचा पादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत .
ड़ दिवसभरात 33 कोरोना मिळाल्याने आतापर्यंत 564 रुग्णांपैकी 490 रुग्ण बरे होवून घरी आले तर 174 सक्रीय आहेत शिवाय चार नागरिकाना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला . त्यात ताम्बोसे , उगवे , पार्से आणि केरी या चार गावातील चार जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला .
आता पर्यंत सर्वाधिक कोरोनांची नोंद मांदे पंचायत क्षेत्रातील; बाधीतचा आकडा 95 वर पोचला आहे . पेडणे पालिका क्षेत्रात 59 रुग्णामुळे दुसऱया क्रमांकावर पोचली आहे .हरमल52 , केरी 11 , मोरजी 17 , कासार्वारणे 13 , न्हयबाग 6 , पार्से 27 , वजरी 19 , वारखंड 15 , पालये 13 , विर्नोडा 23 , कोरगाव 45 हसापुर 8, धारगळ 38 , तुये 35 , तांबोसे 8 , तळर्ण 5 , चोपडे 6 , मालपे 4, खाजने 1 , नागझर 12 , तोरसे 10 मोपा 9 , इब्रामपूर 1 ,उगवे 22 व आगरवाडा 12 मिळून 564 झाला आहे .पेडणे तालुक्मयात कोरोनाचा आकडा वाढत असला तरी कोरोनापासून ठीक होणाऱयांची संख्या लक्षणीय होत आहे .
पेडणे तालुक्मयात कोरोना सेंटर कार्यान्वति होण्यास विलंब होत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे . एका बाजूने कोरोनाचा आकडा वाढतो तर दुसऱया बाजूने तालुक्मयातील रुग्णाना दूर ठिकाणी उपचारासाठी जावे लागत आहे . सरकारने लवकरात लावर कोरोना सेंटर पेडणे तालुक्मयासाठी कार्यरत करावे अशी मागणी केली जात आहे . पेडणे तालुक्मयातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच पेडणे अग्निशमन दलाचेही काम वाढवले जाते .
पेडणे अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्मयात घालून ठिकठीकाणी निर्जुतुनीकरण करत असतात . त्यांच्या सुरक्षतेचाही प्रश्न ऐरणीवर येत आहे . अनेक ठिकाणी निर्जुतुनीकरण करावे लागते . परिसरातील पंचायत कार्यालय , घरे , मंदिर ,परिसरात फवारणी केली जात आहे .पेडणे तालुक्मयातील सीमाभागातील सिंधुदुर्गातील आता सीमा खुल्या झाल्यामुळे कुणीही तालुक्मयाच्या सीमेतून मनमोकळेपणाने प्रवेश करणार आहे . या कारणामुळे कोरोनाच्या लागणीची देवाण घेवाण होण्याची भीती पेडणे तालुक्मयातून व्यक्त होताना दिसत आहे .
कोरोनाची संख्या वाढत असतानाच सीमा खुल्या झाल्यामुळे हा आकडा आता सर्वत्र वाढण्याची शक्मयता आहे . काहीजण तर मास्क न वापरता फिरण्याचे चित्र पहावयास मिळत आहे शिवाय बाजारात होणारी दिवसेंदिवस गर्दीही वाढत आहे . शाररीक सुरक्षित अंतर ठेवले जात नाही .
ड़ जागृतीकडे दुर्लक्ष
पेडणे तालुक्मयातील एकूण वीस पंचायती व एक पेडणे नगर पालिका कोरोना विषयी जनजागृती करत आहे . कोणती काळजी घ्यावी या विषयी जनजागृती चालू आहे . मात्र या जनजागृतीवर पाठ फिरवली जाते . काहीजण आपली कोविड टेस्ट करतात आणि दिवसभर फिरतात नंतर त्यांचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे धावपळ सर्वांची होती .









